कृष्णा पैठणे,
वणी (प्रतिनिधी): वणी- शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमध्ये इतर कौशल्यांची रुजवात करुन त्यांचे अष्टपैलु व्यक्तीमत्व घडवण्यासाठी पालकांनी सजग रहावे असे प्रतिपादन दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी वणी येथे पैठणे क्लासेस आयोजीत बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी केले. ज्ञान अबॅकस चँम्पीयनशीप २०२४ या आंतराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत वणी येथील पैठणे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले. त्यांचा बक्षीस वितरण सोहळा आज रविवार दि. १६ रोजी वणी येथे आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे नवनियुक्त खासदार भास्कर भगरे उपस्थित होतेे. यावेळी भगरे यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी वमकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा, संताजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पारख, ग्रा.प. सदस्य किरण गांगुर्डे आदींच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
ज्ञान अबॅकस ऑनलाईन चँम्पिअनशिप 2024 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पैठणे क्लासेसचे ५१ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात ७ मिनिट २९ सेकंदात १५० गणितीय उदाहरणे बरोबर सोडवुन चँम्पियन ऑफ दि चँम्पियन चा पुरस्कार अनन्या सुभाष वाडेकर हिने पटकावला. तिला खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यासोबतच पार्थ शर्मा, आरव कोरडे, किर्तीराज दसनोर, रुतुजा शिरसाठ, ईश्वरी गांगुर्डे, संकेत गावित, सिद्धी पाटील, रुत्विक सालुंखे हे चँप्मियन होण्याचा मान पटकावला. तर रतिष सातपुते, तन्मय रणधीर, लियाना शर्मा, अनुज शार्दुल, प्रनाद पैठणे, यश पाटील, वेदीता कर्डीले, तनिष्का सोनवणे व परिस पैठणे हे विद्यार्थी विनरच्या श्रेणीत आहे, तसेच पियुष झांकर, कायरा खेमानी, तनिष्का जाधव, श्रीजीत शेठे, वेदांत जंगम हे रनरअप १ मध्ये तर तोष्ना जाधव, नशरा शेख, चिंरतन पाटील, दुर्वा कोकाटे, अर्सलानखान पटाण, ओम भांबेरे, स्वयंमसिंग राठोड आदींनी रनरअप २ या श्रेणीत मिळवली. तसेच २०२४ च्या नवोदय परिक्षेत उत्तिर्ण झालेला कृषीसेवक सुनिल गांगुर्डे याचा ही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच पैठणे क्लासमधील ६० टक्क्यांपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी विवीध श्रेणीत यश संपादीत केल्यामुळे क्लासेसलाही उत्कृष्ट ट्रेनिंग सेंटर या सन्मानाने गौरविण्यात आले. उपस्थित पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त करीत क्लास व्यवस्थापनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन दिले. यावेळी व्यासपीठावर डॉ. योगेश गोसावी, सचीन कड, किशोर बोरा, माळेकर गुरुजी आदींसह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना क्लासेसचे संचालक नामदेव पैठणे, स्मिता पैठणे, मार्गदर्शक किरण पैठणे, पुनम शर्मा, नाझिया शेख, दिप्ती शर्मा आदींचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र पैठणे यांनी केले.
