श्री नवकार आशिष सेवा ट्रस्टचा उपक्रम, नावनोंदणीनंतर ७ जुलैला घेणार माप
गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन
विनामूल्य डायलिसिस केंद्र अनेक रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची गरज असते. अतिशय खर्चिक आल्याने अनेक रुग्ण डायलिसिस टाळतात. त्यामुळे तब्येत अधिकच बिघडते. कोणीही गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी नवकार आशिष सेवा ट्रस्टतर्फे श्री महावीर जैन धर्मार्थ हॉस्पिटल संचालित आरएमडी हॉस्पिटल येथे विनामूल्य डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. गरजूंनी लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.
नाशिक (प्रतिनिधी): उत्तर भारतीय प्रवर्तक प. पू श्री आशीष मुनीजी म. सा. यांच्या ५१ व्या दीक्षा दिवसानिमित्त श्री नवकार आशिष सेवा ट्रस्ट, साधू वासवानी मिशन पुणे व श्री महावीर जैन धर्मार्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम अवयव (हात, पाय) बसवण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून १००८ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे प्रत्याराेपण करण्यात येणार आहे. अवयव तयार झाल्यावर महिनाभरात ते बसवून देण्यात येणार असून व त्यांच्याकडून सराव करून घेण्यात येईल, अशी माहिती नंदकिशोर पारख, जे. सी. भंडारी, सतीश बोरा, पारस साखला यांनी दिली.
कृत्रिम अवयव प्रत्यारोपणासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीनंतर ७ जुलैला सकाळी ९ वाजेपासून पेठरोड आरटीओ ऑफिसजवळील श्री महावीर धर्मार्थ दवाखाना संचालित आरएमडी शिबिरात प्रत्यक्ष मापे घेतली जातील. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी गरजूंनी नवकार आशीष ट्रस्ट (९८५०९०५७८५) श्री महावीर जैन धर्मार्थ हॉस्पिटल (९६०७४०११२३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
