नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर गावातील कवडे गार्डन भागात पिस्तूल घेवून फिरणा-या तरूणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने केली.
सनी संजय कटारे (वय २४, रा.कटारे गल्ली, गंगापूरगाव) असे संशयिताचे नाव आहे. अंमलदार अशोक अघाव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळत त्याची अंगझडतीत देशी बनावटीचा पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस असा सुमारे ३१ हजार रुपये किंमतीचा ऐवज मिळून आला. संशयितासह मुद्देमाल गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक अधाव, राजेश राठोड, सुनीता कवडे आदींच्या पथकाने केली.
