डाेक्यात टाॅमी घालून नाशिकराेडला युवकाची भरदिवसा हत्या!

नाशिक (प्रतिनिधी): जमिनीच्या वादातून पाच युवकांनी भरदिवसा एका युवकावर प्राणघातक हल्ला करत डोक्यात लोखंडी टाॅमी मारत हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ५ वाजता घडला. सिन्नर फाटा परिसरातील चेहडी शिव येथील एका वाईनच्या दुकानासमोर हा थरार घडल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. प्रमोद रामदास वाघ (४०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मयत प्रमोद वाघ

याप्रकरणी नाशिकराेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रमोद वाघ हा सर्व्हिस रोडने दुचाकीने सिन्नर फाट्याकडे येत असतांना संशयित योगेश पगारे व त्याच्या चार मित्रांनी वाघ याला अडवले. जमीनीचा वाद घालत मारहाण केली. यातील एका संशयिताने शेजारील पंक्चरच्या दुकानातून लोखंडी टाॅमी उचलून वाघ याच्या डोक्यात मारली. वर्मी घाव बसल्याने वाघ खाली कोसळला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. वरीष्ठ निरीक्षक अशोक गीरी व पथकाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. पथक संशयितांच्या मागावर आहे. पाळत ठेवून हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळावरील सीसी टिव्ही फुटेज तपासणी सुरु अाहे. या अधारे संशयितांचा माग काढला जात आहे. भरवस्तीत खुन झाल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!