बांधकाम व्यवसायिक व जागा मालकाच्या वादात पोलिस निरीक्षकांवरच केला हल्ला!

अंबड (प्रतिनिधी): येथील लिंकरोडला जवळील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सातपेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ गाडे मळा येथे दोन गटात बांधकामावरून वादावादी सुरु असल्याची माहिती उपनिरीक्षक सविता उंडे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ निरीक्षकांना कळवत नियंत्रण कक्षातील राखीव पोलीस घेऊन घटनास्थळ गाठले. बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालकाचे नातलग यांच्यात वाद सुरु होता. बांधकाम व्यवसायिक माणिक सोनवणे यांचा जागेच्या मालकी हक्कावरुन गाडे यांच्याशी वाद असल्याची माहिती मिळाली. न्यायालयाच्या आदेशाने मनपा प्रशासनाच्या वतीने पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आदेशित करण्यात आल्याचे समजते मात्र वाद विकोपास गेल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पुढील कार्यवाही पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!