महिलेवर बलात्कार करणा-या भोंदूची पोलीस कोठडीत रवानगी!

नाशिक (प्रतिनिधी): पोटदुखीवर उपचार करण्याचा बहाणा करीत गावठी उपचार करणा-या भोंदूने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुंगी आणणारा पदार्थ अंगावर फुंकत पीडितेला बेशुद्ध करीत तिच्याशी दुष्कृत्य करणा-या संशयितास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसन यासीम शेख (रा. गल्ली नं.२, मेहमूदनगर, वडाळा गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत राहणा-या पीडित विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. या पीडितेस पोटदुखीचा त्रास आहे. अनेक ठिकाणी उपचार करूनही त्यात फरक पडत नव्हता. वडाळा गावात गावठी उपचार करणारा असून, तो दुर्धर आजार बरे करीत असल्याची माहिती पीडितेच्या पतीस मिळाली होती. त्यानुसार, दाम्पत्य संशयिताच्या घरी गेले होते. या ठिकाणी पीडितेची तपासणी करून गावठी औषधोपचार करण्यात आले.
त्यानंतर संशयिताने पुन्हा संधी साधून पीडितेवर अत्याचार केला. पीडितेने पतीकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीस ठाण्यात पोहोचला. याप्रकरणी सहायक निरीक्षक अंकोलीकर तपास करीत आहेत. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने संशतियास शनिवार (दि. ३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!