विज बंद शनिवारी: राणेनगर, इंदिरानगर परिसरात दिवसभर बत्ती गुल!

नविन नाशिक (प्रतिनिधी): अंबड उपकेंद्राच्या अंतर्गत विद्युत मंडळाचे दुरुस्ती काम केले जाणार असल्याने शनिवारी (दि.३) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राणेनगर, इंदिरानगर भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती विद्युत मंडळाच्या राणेनगर कक्षाचे सहायक अभियंता यांनी कळवले आहे.

१३२/३३/११ केव्ही अंबड उपकेंद्रअंतर्गत शनिवारी (दि.३) देखभाल व दुरुस्तीसाठी चेतनानगर, वासननगर, नयनतारा, राजीवनगर, राणेनगर, किशोरनगर, पांडवनगरी, समर्थनगर, शिव कॉलनी, सराफनगर, इंदिरानगर, पार्कसाइड, मेट्रोझोन, आव्हाड मळा, नागरेनगर, सोनवणे मळा, ज्ञानेश्वरनगर, श्रद्धा विहार, श्रद्धा गार्डन, सदिच्छानगर, सिमेन्स कॉलनी या परिसरातील वीज पुरवठा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अथवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब होऊ शकतो याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक अभियंता, महावितरण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!