बुधवारपासून भुजबळ नॉलेज सिटी व आडगाव परिसरातील वाहतूक मार्गात बदल

ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी धावण्याची चाचणी होणार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी बुधवारपासून (दि. १९) १६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ नॉलेज सिटी व आडगाव परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून या संदर्भात शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसुचना जारी केली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदाच्या ३२ जागा रिक्त आहेत. यासाठी सुमारे १५ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. येत्या बुधवारपासून भरतीसाठी असलेल्या उमेदवारांची १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होते आहे. ही चाचणी दि. २३ जूनपर्यंत पहाटे ५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भुजबळ नॉलेज सिटी ते सावता महाराज चौफुली (मुंबई-आग्रा महामार्गलगतचा सर्व्हिस रोड) दरम्यान होणार आहे. त्यामुळे नाशिक शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दि. १९ ते २३ तारखेदरम्यान धावण्याच्या चाचणी मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!