प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): ‘पुंजाबाबांचा’ ‘भाताचा लढा’ शेतकरी चळवळीत क्रांतिकारी होता त्यातून प्रेरणा घेऊन भारतात अनेक शेतकरी लढे बाबांच्या ‘भाताच्या लढ्यातून’ स्फूर्ति घेऊन शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून लढले, असे प्रतिपादन बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. भास्कर पवार यांनी टाके घोटी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र शेतकरी नेते कॉम्रेड माजी आमदार पुंजाबाबा गोवर्धने यांच्या जयंती निमित्ताने केले.
पुंजाबाबांच्या प्रतिमेचे पुजन करून महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त कॉम्रेड आमदार पुंजाबाबांच्या प्रतिमेचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन अॅड.भास्कर पवार उपस्थित होते.
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक अॅड.संदिपभाऊ गुळवे होते त्यांनी आपल्या भाषणात महर्षी पुंजाबाबांनी तालूक्याला जो आकार देण्याचा प्रयत्न केला तसेच इगतपुरी हा डोंगरी भाग असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते, म्हणून दारणा, वैतरणा, कडवा नद्यांवर धरणे बांधून शेतीचा विकास करता येईल असे पुंजाबाबांना वाटत होते यातून आपल्याला तालूक्याच्या विकास करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन केले. तर अतिथी मनोगतात सौ.प्रतिभा गोवर्धने यांनी ‘ पुंजाबाबांचा’ वारसा इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यातील विद्यार्थांचा शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने गोवर्धने परिवारातर्फ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थांचा बक्षिस व प्रशस्तिपत्राद्वारे पाठीवर थाप देऊन गौरव करण्यात येऊन त्यांना प्रेरित करण्याचे काम महाविद्यालयात व गोवर्धने परिवार करीत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.किरण रकिबे यांनी ‘पुंजाबाबांना’ अपेक्षित असे शैक्षणिक वातावरण व विकास योजना महाविद्यालयात राबवून हे महाविद्यालय आज ‘आदिवासी भागात’ शैक्षणिक क्षेत्रातील विकास व संस्थेच्या ध्येय धोरणानुसार शैक्षणिक प्रसारात आघाडी घेतली आहे. यातून अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून पुंजाबाबांचे नावलौकिक वाढवित आहेत असे सांगितले.
यावेळी कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने जयंतीनिमित्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थांचा बक्षिस व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी गोवर्धने परिवारातील अॅड.जयंतराव गोवर्धने, उत्तम गोवर्धने, सौ.प्रतिभा गोवर्धने, नितीन गोवर्धने, विजय गोवर्धने, प्रशांत गोवर्धने, विलास गोवर्धने, स्वप्नील गोवर्धने, तर स्थानिक व्यवस्थापन समितीअध्यक्ष संपतराव मुसळे, पांडुरंग मामा शिंदे, इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे तसेच अनेक मान्यवर स्थानिक व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.विष्णू राठोड तर आभारप्रदर्शन ज्योती भोर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी डाॅ.बसवराज पाटील, प्रा.कन्हैया चौरेसिया, प्रा.एस.एस.परदेशी, प्रा.संजय फाकटकर, प्रा.राकेश गायकवाड, श्वेता झणकर , प्रतिक्षा पल्ले , चंद्रकांत खातळे, महेश आरोटे यांनी प्रयत्न केले.
