लावला पिंजरा: पाडळी देशमुख शिवारातील चार बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागापुढे अवाहन!*

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वनविभाग सतर्क!

प्रभाकर आवारी,

मुकणे (प्रतिनिधी): इगतपूरी तालुक्यातील पाडळी देशमुख तब्बल चार बिबटयाचा मुक्त संचार होता इगतपुरी वनविभागाने याची दखल घेत आज घटनास्थळी भेट देऊन बिबटे पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. शुक्रवारी पाडळी देशमुख मळ्यांमधील नागरिकांवर घरांकडे परतत असतांनाच सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या जवळच राहणारे विलास धांडे यांच्या घराजवळ एका मोटारसायकलवर बिबट्याने धाव घेतली ही माहीती गावकऱ्यांना समजल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत अनुचित प्रकार घडु नये यासाठी सदर गावकऱ्यांनी रात्री अडीच वाजेपर्यंत घटनास्थळी थांबुन होते. इगतपुरी वनविभागाने येथे पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले जाईल असा ईशारा पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सरपंच जयराम धांडे, दिनेश धोंगडे, रतन धांडे आदिंनी दिला होता. अखेर याची दखल घेत इगतपुरी वनविभागाच्या कावेरी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने येथे पिंजरा लावल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी सरपंच खंडेराव धांडे, भगवान गजीराम धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सरपंच जयराम धांडे, दिनेश धोंगडे, रामभाऊ धोंगडे, तुकाराम वारघडे, रतन धांडे, बाळासाहेब धांडे, उत्तम फोकणे, महेश धांडे, कर्मयोगी प्रतीष्ठानचे फकीरराव धांडे, भगवान आमले, डॉ.शुभम वारुंगसे, मंगेश गवारी, वैभव धांडे, विशाल गवारी, स्वप्निल धांडे, ऋषिकेश शिंदे, सोहम धांडे, निलेश धांडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!