नवीन नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील सावतानगर येथे गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच आता सावतानगर भागात सहा ते सात दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिका-यांना कळवूनही दाखल घेतली नसल्याने महिला वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत मनपाच्या अधिका-यांना सांगितले, तसेच आनलाईन तक्रार देखील केली. मात्र, कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांनी व अॅड. अतुल सानप यांनी सांगितले.
Related Posts
अंबड, सिडकोतील पाण्याच्या समस्येने त्रस्त महिलांचा महापालिकेवर हंडा मोर्चा काढत संताप
अधिका-यांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने गनिमीकाव्याने महिलांच्या आठ-दहा बसेस थेट मनपा आवारात. अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असल्याने उद्रेक नाशिक…
गणपती विसर्जनाला गालबोट: दोन युवक पाथर्डीला पाण्यामध्ये बुडाले!
नाशिक (प्रतिनिधी): गणपती विसर्जनाच्या सायंकाळी साडेसहा वाजता पाथर्डी शिवारातील नांदूर रस्ता भागातील वालदेवी नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या पाथर्डी फाटा…
नाशिक जिल्ह्यात ७०० द्राक्ष उत्पादकांची व्यापा-यांकडून कोट्यवधींचा चुना
द्राक्ष बागायतदार संघाकडे तक्रारी; शेतक-यांची अजित पवारांकडे धाव नाशिक (प्रतिनिधी): राज्यात द्राक्ष उत्पादक शेतक-यांची दरवर्षी व्यापा-यांकडून फसवणूक केली जात आहे.…
