नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणाची कुरापत काढून धारदार कोयत्याने तरुणाची हत्या करणा-या टोळक्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवार (दि. २७) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाथर्डी गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा संशयितांना हुडकून काढले आहे. दुर्गेश दीपक शार्दुल (वय २३), प्रफुल्ल अमोल दोंदे (वय २०), आयुष ऊर्फ यश विजय दोंदे (वय १९), गौरव रवींद्र दोंदे (वय १९), छोट्या उर्फ करण पंकज भांबळ (वय २०, सर्व रा. पाथर्डी गाव, राजवाडा) व रोहित रामदास वाघ (वय २०, रा. राजीवनगर वसाहत, इंदिरानगर) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पाथर्डी गावात नटेश विजय साळवे (वय २०, रा. विल्होळी) या तरुणाची रविवारी (दि.२२) रात्री दहाच्या सुमारास हत्या करण्यात आली. पाथर्डी गावातील काझी मंजिल येथे सहा ते सात युवकांनी त्याला गाठून जुन्या वादातून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करीत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संशयितांनी नटेश साळवे याच्यावर एकूण २९ वार केल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जिल्हा रुग्णालयात त्यास मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी शशिकांत गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी रात्रीतून संशयितांना जेरबंद केले आहे.
Related Posts
सावतानगरचे नागरिक गेल सात दिवसांपासून करताय गढूळ पाण्याचा सामना
नवीन नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील सावतानगर येथे गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले…
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघाेषात डीजीपीनगर-2ला पालखी मिरवणूक
नाशिक (प्रतिनीधी): अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…, दत्त महाराज की जय…असा जयघाेष करीत अंबड येथील…
नाशिकमधील मनपा शाळा होणार दिल्लीतील मॉडेल स्कूल प्रमाणे!
नाशिक (प्रतिनिधी): मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळाने दिल्ली येथील मॉडेल स्कूलचा…