नाशिक (प्रतिनीधी): अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…, दत्त महाराज की जय…असा जयघाेष करीत अंबड येथील डीजीपी नगर नं.2 येथून दत्त जयंतीनिमित्त सवाद्य पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी रांगाेळ्या काढत घराेघरी पालखीचे पूजन केले. सायंकाळी महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळील साधारण पंधारसे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.डीजीपीनगर क्र. 2 येथील दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
श्री दत्त मंदिराचा चाैदावा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. विद्युत राेषणाईने मंदिर परिसर लखलखला हाेता. सायंकाळी सत्यनारायण पूजा, श्रींचा जन्माेत्सव साेहळा, महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. तसेच याठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, माजी नगरसेवक दिपक दातीर तसेच अजय बाेरस्ते, शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्य, राेशन शिंदे, शिवसेना मध्य नाशिक विधान सभा प्रमुख यांनी उपस्थिती लावली.याठिकाणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वृंदा मथुरे, भाग्यश्री घरटे, मीना सरनाईक, आपर्णा सरनाईक, दुहिता वाघ, गीता परेडा, वंदना खेलुकर, स्मित खेलुकर आदींसह ज्येष्ठ नागरिक व महिलांनी परिश्रम
घेतले.