▪️5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार; याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली
▪️फेंगल चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात; फेंगलमुळे हवामान खात्याने हाय अलर्ट घोषित
▪️दक्षिण आफ्रिकेने मायदेशातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली; दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी धुव्वा उडवला
▪️दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला
▪️’EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा’; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
▪️’शासन आपल्या दारी’चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ प्रदान
▪️मुंबईत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड, महिलेला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण
▪️विधानसभेला मित्रपक्षांनी पाठीत केला वार! स्थानिक स्वराज्य संस्थावेळी मविआ नको, सोलापुरातील ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची भूमिका
▪️शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा