महायुतीने आर पी आय ला विश्वासात घ्यायला हवे: साबळे

घोटी (प्रतिनिधी) : आर पी आय आठवले गट हा महायुतीत काम करणारा घटक पक्ष असून महायुती कडून आर पी आय च्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान दिला जात नाही, त्यामुळे आगामी विधानसभेत आर पी आय इगतपुरी तालुका हा महायुती काम करणार नाही असा इशारा इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब साबळे यांनी दिला आहे. उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या आदेशानुसार इगतपुरी तालुक्यात पत्रकार परिषद झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की महायुती कडून जिल्हा पदाधिकारी यांना नेहमीच डावले जातं असून कुठलाही कार्यक्रम असला तर आर पी आय पदाधिकारी यांचे फोटो लावले जातं नाही गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीत काम करत असताना हा दुजाभाव का असा प्रश्न यावेळी साबळे यांनी उपस्थित केला.

इगतपुरी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब साबळे, युवा नेते उमेश रोकडे, युवक तालुकाध्यक्ष योगेश भरीत, युवा तालुका उपाध्यक्ष रवींद्र पवार, युवक जिल्हा उपध्यक्ष आनंद बर्वे, तालुका कार्यध्यक्ष अशोक मोरे, सागर दिवेकर, अनिल कडलग, सागर जाधव,रविंद्र साबळे, रवींद्र उबाळे, अंतू मुकणे, मनोहर उबाळे, विजय चंद्रमोरे,काळू मुकणे, लहानू साबळे, विशाल लाकडे, शिवाजी साबळे, पपू कवर, आनंदा जाधव, रामदास वाघ, राहुल दाभाडे, विक्रम जाधव, स्वप्नील साबळे, समाधान उबाळे, विशाल उबाळे, विकास जाधव, प्रशांत साबळे, विनोद चंद्रमोरे, प्रशिक साबळे, किरण जाधव, नवनाथ साबळे, गोकुळ राव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मोरे यांनी केले तर आभार आर पी आय नेते उमेश रोकडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!