एक्साईज विभागाने दारूबंदी कायद्यान्वये ३० गुन्हे दाखल करीत २८ मद्यतस्करांच्या मुसक्या आवळल्या!

नाशिक (प्रतिनिधी): निवडणुकीतील प्रचार आणि रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना खुष ठेवण्यासाठी होणारा मद्यपुरवठा लक्षात घेत सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू होता. मद्यनिर्मीतीसह बेकायदा वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी सीमा भागांसह गाव पाड्यासह शहरातही छापेमारी सुरूच आहे. ड विभाग भरारी पथकाने गेल्या महिन्याभरात डोंगरद-या व गावपाडे पायदळी तुडवित दारूबंदी कायद्यान्वये ३० गुन्हे दाखल करीत २८ मद्यतस्करांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत गावठी दारूच्या हातभट्या उध्वस्त करीत पथकाने ६४० लिटर दारू जप्त केली, तर ५ हजार ३८० लिटर रसायन नष्ट केली. याबरोबरच देशी दारूचा २८७ लिटर बेकायदा साठा हस्तगत करण्यात आला असून विदेशी दारूचा १०१ लिटर साठा जप्त करण्यात आला आहे.
त्यात राज्यात बंदी असलेल्या दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील ११९ लिटर दारूची बेकायदा वाहतूक रोखण्यात पथकाला यश आले आहे. या सर्व कारवायामध्ये आठ वाहने जप्त करण्यात आले असून यात दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन.एच.गोसावी,दुय्यम निरीक्षक आर. एन. सोनार, एस. आर. इंगळे सहायक दुय्यम निरीक्षक एच. एस. नेहरे, जवान सोन्याबापू माने, महेश खामकर, लक्ष्मीकांत आहिरे, उर्वेश देशमुख व स्वप्निल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!