आता विजवितरण कंपणीतही लाच घेणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात!

सहाय्यक अभियंता विरूध्द  ४५००/- रु रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): अमित दिलीप सुलक्षणे, सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, चोपडा शहर कक्ष-२ यांस लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

तक्रारदार यांच्या घरी नवीन वीज मीटर बसून देण्याकरिता अमित सुलक्षणे याने ५५००/- रुपये लाचेची मागणी केली बाबत तक्रारदार यांनी काल लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने सदर तक्रारीची पडताळणी केली असता सुलक्षणे याने तक्रारदार यांच्या घराचे वीज मोटर बसवून देण्यासाठी तडजोडी अंती ४५००/- रुपये मागणी करून सदर लाचेची रक्कम आज स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!