ॲड. जाधव गोळीबार प्रकरण: आरोपींना दिली सात दिवस पोलीस कोठडी

नाशिक (प्रतिनिधी): ॲड प्रशांत खंडेराव जाधव यांनी सन 2022 मध्ये दिलेल्या फिर्याद नुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 77/2022 भादवि कलम 307, 120 ब, 34 सह आर्म ॲक्ट कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्य तपासात आरोपी नामे १) आकाश आनंदा सूर्यतळ, २) टक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे, ३) बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकोडे, ४) प्रसाद संजय शिंदे, ५) परीनय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे ६) मयूर चमन बेद असे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात येऊन न्यायालयाचे आदेशान्वये पोलीस कस्टडी रिमांड व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर आरोपी दीपक सुधाकर बडगुजर याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीतानी संघटित गुन्हेगारी करून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 ( मोक्का)चे कलम समाविष्ट करण्याची परवानगी मिळण्यासाठी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असता पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी परवानगी दिल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 च्या कलमांचा समावेश करण्यात आला होता. तसेच गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) मधील कलमे समाविष्ट करण्यात आल्याने सदर कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी यांची गुन्ह्याचे तपास कामी पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी तपास अधिकारी संदीप मिटके, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दि. 25/11/2024 रोजी विशेष न्यायालयात अहवाल दाखल करून युक्तिवाद केला असता न्यायालयाने अहवाल स्वीकारून वरील नमूद एक ते सहा आरोपींची दि. 26/11/2024 ते दि. 2/12/ 24 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे. आरोपीना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन तपास अधिकारी संदीप मिटके हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!