महिला डॉक्टरसह, एका बड्या व्यावसायिकाला ७८ लाखांचा गंडा

धक्कादायक : ऑनलाईन शेअर्स खरेदीत मोठी फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाईन आयपीओ घेत त्या खात्यात विविध कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सांगून शहरातील एक महिला डॉक्टरला ७५ लाख अाणि व्यावसायिकाला ४ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आसून महिनाभरात शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत २३ नागरिकांची अडीच कोटींची फसवणूक झाल्याचे नोंद सायबर पोलिसांत करण्यात आला आहे.

पोलिसांची माहिती आणि महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार मोबाइलवर अनोळखी नंबरहून आलेल्या फोनव्दारे शेअर्स मार्केट संबंधीत २ ग्रुपवर जॉईन होण्यास सांगीतले. त्यामाध्यमातून अप्पर सर्किट स्टॉकबद्दल वेळोवेळी माहिती दिली. संशयितांनी त्यांच्या बनावट कंपनीच्या बनावट कर्मा कॅपिटल ट्रेडींग व व्हाईट अशा प्लॅटफॉर्मवर खाते ओपन करण्यास सांगीतले. महिलेने तसे खाते उघडले. संशयितांनी आयपीओ घेण्यासाठी विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यास सांगत संशयितांनी बँक खाते नंबर दिले. या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने महिलेने ७५ लाखांची रकमेचे शेअर्स खरेदी केले. अशाच प्रकारे संशयितांनी ग्रुप मधील एका व्यावसायीकाचीही ४ लाखांची फसवणूक केली.

नागरिकांनीच सतर्क रहावे

ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगत असल्यास सतर्क व्हा. शेअर्स कंपन्यांच्या हुबेहुब नावाचा वापर करत कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगून फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. हा मोठा स्कॅम आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी फसवणूक टाळावी.

रियाज शेख, वरीष्ठ निरीक्षक सायबर पोलिस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!