नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील नऊ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. ११) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेत प्रारूप प्रभागरचनेसह आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणता प्रभाग आता राखीव होणार व कोणता खुल्या वगार्साठी सुटणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चालूवर्षी मुदत संपणा-या, तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुुरू केल्या आहेत. पहिल्या टप्यात गावपातळीवर प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याकरिता मंगळवारी (दि. ११) विशेष ग्रामसभा घेण्यात येईल. तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-याच्या अध्यक्षतेत या सभेमध्ये अनुसूचित जाती व जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तसेच सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढण्यात येईल. तर २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देतील. प्रभागरचना सोडतीमुळे इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.
