दिव्यांग सागर व अजय यांचा “रेस अक्रॉस इंडिया” मध्ये सहभाग

नाशिक (प्रतिनिधी): “रेस अक्रॉस इंडिया” ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असे 3651 किलोमीटर होत आहे.जम्मू काश्मीर, लुधियाना, दिल्ली, ग्वालियर, सगर, नागपूर, निर्मल हैदराबाद, अनंतपुर, हिसुर ,मदुराई आणि कन्याकुमारी अशा 12 राज्यांमधून सदर रेस संपन्न होणार आहे. दिव्यांग जागतिक विक्रमवीर सायकल पटू सागर बोडके व अजय ललवाणी यांनी रेस अक्रॉस इंडिया मध्ये टॅन्डम सायकलवर सहभाग नोंदविला आहे. त्यांना मदतनीस म्हणून पायलट रायडर्स – संकेत भानोसे, उल्हास कुलकर्णी, रामेश्वर चव्हाण, सुशील सारंगधर , गिरीश घाम बोले सहभाग नोंदवत आहेत. तसेच महेश दाभोळकर, संतोष संसारे, अंबरीश गुरव, डॉ. अनिल बारकुल, शिवम खरात, विठोबा कोचरेकर व सतीश जाधव मदतनीस म्हणून सपोर्ट स्टाफ म्हणून कार्यरत असणार आहेत. सदर टीम टीमने ह्या इव्हेंटला रेस फॉर व्हिजन असे नाव दिलेले आहे. सागर व त्याचे सर्व मदतनीस रिले पद्धतीमध्ये सायकल चालवत नवीन जागतिक विक्रम रचण्याचा प्रयत्न करणार आहेत. नाशिकचे गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. बीडचे डॉक्टर अनिल बारकुल यांनी सदर टीम साठी खूप मोठा सहभाग व सहयोग दिला आहे. ही स्पर्धा 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर – काश्मीर ते कन्याकुमारी अशी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!