१४ वर्षांखालील क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी दिनांक ७ व ८ सप्टेंबर पर्यंत
नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असुन त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवार व रविवार दिनांक ७ व ८ सप्टेंबर रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे.
यासाठी १ सप्टेंबर २०१० (०१/०९/२०१०) नंतर जन्मलेल्या खेळाडूंचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत शुक्रवार ६ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
संघ निवड चाचणी शुल्क प्रत्येकी तीनशे रुपये आहे. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.
नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात, स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह सांगितल्यानुसार, शनिवार वा रविवार दिनांक ७ वा ८ सप्टेंबर रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर सकाळी साडेनऊ ( ०९३० ) वाजता हजर रहावे.
