अखिल भारतीय सिव्हिल सेवा टूर्नामेंटसाठी नाशिकचे रेल्वे डाक सेवेचे रत्नाकर शेजवळ यांची निवड

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवेचे राष्ट्रीय सायकल खेळाडु रत्नाकर शेजवळ याची योगासना टूर्नामेंट साठी निवड. प्रतिनिधी मुंबई नुकत्याच आयकर भवन मरीन लाईन्स मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासना निवड चाचणीत नाशिक चे राष्ट्रीय सायकल खेळाडु रत्नाकर शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे.

चंडीगड (पंजाब) येथे 5 मार्च ते 8 मार्च रोजी होणाऱ्या अखिल भारतीय सिव्हिल सेवा टूर्नामेंट साठी निवड झालेले ते जिल्ह्यातील पाहिले खेळाडु असून त्यांच्या सोबत पुणे येथील पोस्ट मास्तर राजू गवारी व सोलापूर मधील डाक सहायक सोमलिंग मेहत्रे यांचीं देखील महाराष्ट्र योगासना संघात निवड झाली असून त्यांना योगा शिक्षक वैशाली पुरोहित,श्वेता म्हात्रे व मयूर खामकर यांचे मार्गदर्शन लाभले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!