गोल्फ खेळाचा छंदामुळे बागमार यांनी २२ एकर जमीन गोल्फ क्लबसाठी लावली पणाला; विद्यार्थ्यांमध्ये होतेय आवड निर्माण

महाविद्यालयीन युवकांना मिळवून देताय गोल्फ मधून आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी!

नाशिक (प्रतिनिधी): गोल्फ हा खेळ श्रीमंतांसाठी आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी निफाड येथे स्वतःच्या जागेत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत गोल्फ शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली.
निफाड-कुंदेवाडी रस्त्यावर विंग कमांडर प्रदीप बागमार यांची नदीलगत २२ एकर जमीन आहे. एक छंद म्हणून व गोल्फचा प्रसार व्हावा या उद्देशाने बागमार यांनी रिव्हर साईड गोल्फ क्लबची स्थापना केली. आजूबाजूच्या छोट्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी तेथे मोफत गोल्फ शिकवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या मुलांना या खेळाबद्दल अजिबात माहिती नव्हती. क्रिकेट सोडला तर दुसरा कुठलाही खेळ ते खेळत नव्हते. मात्र हळूहळू त्यांच्यामध्ये या खेळाबद्दल आवड व आकर्षण निर्माण झाले. सरावानंतर पाचवी, सहावी, सातवीचे विद्यार्थी आता सराईतपणे गोल्फ खेळू लागले आहेत. या खेळामधून खेळ शिकणे, खेळणे व त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी महाविद्यालयीन युवकांना याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. गोल्फ खेळत असताना सहाय्यकाची आवश्यकता असते. त्यामुळे नाशिकमधून येणारे हौशी गोल्फ खेळाडू सहाय्यक म्हणून महाविद्यालयातील मुलांना प्राधान्य देतात व त्यामधून मुलांना आर्थिक उत्पन्नही मिळते, असे श्री. बागमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!