तीन दिवसांपासून जलवाहिनीच्या गळतीमुळे २लाखहून अधिक लिटर पाण्याचा अपव्यय

तक्रारी करूनही दुरुस्ती काम नाही;  नागरिक संतप्त

नाशिक ( प्रतिनीधी ): पाटीलनगर येथील नाईकमळा भागात गेल्या तीन दिवसापासून पाईपलाईन फुटल्याने दोन लाख लिटरहून अधिक पाणी वाया गेल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिकेचे सिडको विभागातील पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांच्याकडे सलग तीन दिवसापासून रहिवाशांनी तक्रार देऊनही अद्याप दुरुस्ती करण्यात ना आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य म्हणजे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक यांनी विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्याकडे तक्रार करूनही कुठलाही प्रतिसाद ना मिळाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकीकडे परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्याने १५ हजारहून अधिक नागरिकांना रोज पणी समस्येला सामोरे जावे लागत असताना अशा प्रकारे नासाडीकडे दुर्लक्ष होत

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!