के.के. वाघ कॉलेज परिसरात बिबट्याची दहशत; बकरी केली ठार

पंचवटी ( प्रतिनीधी ): बिबट्याच्या हल्ल्यात बकरी ठार झाल्याची घटना रासबिहारी रोडवरील माने नगरमध्ये के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज शेजारी सोमवार (दि. १४) सकाळी घडली. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मखमलाबाद परिसरात बिबट्याने श्वानावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना ही घटना समोर आली आहे. के. के. वाघ अग्रीकल्चर कॉलेज शेजारी असलेल्या प्लॉटवर नारायण तूपसमुद्रे वास्तव्यास आहे. त्यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी साडे सहा वाजता बिबट्याने त्यांच्या बकरीवर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका प्रियांका माने, धनंजय माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन विभागाच्या अधिकाºयांना संपर्क साधला. वन विभागाचे नियत क्षेत्र अधिकारी राजेंद्र ठाकरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी पाहणी केली. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!