आरोग्य कल्याणासाठी पोषणावर संशोधन गरजेचे : वाय. टी .शिवशंकर तिमानपती

आई ए पी इ एन इंडिया नाशिक शाखेचा पदग्रहण सोहळा संपन्न

नाशिक (प्रतिनिधी): संतुलित आहार हा कोणत्याही रुग्णाच्या प्रकुती सुधारण्यावर विशेष लक्षणीय परिणाम करू शकतो. त्यामुळे पोषण हे आरोग्य आणि मानवी कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी अभ्यासाची रचना आणि आयोजन करताना संशोधकांनी पोषणावर संशोधन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन IAPEN India संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे चीफ क्लीनिकल नुट्रीशिनिस्ट डॉ.शिवशंकर तिमानपती यांनी शनिवारी नाशिक मधील हॉटेल ट्रीट येथील आयोजित कार्यक्रमात केले. ते हाऊ टू कंडक्ट रिसर्च इन न्यूट्रिशन या विषयावर बोलत होते. यावेळी आई.ए.पी.इ.एन इंडिया असोसिएशनच्या नाशिक शाखेचा पदग्रहण सोहळा संप्पन झाला. कार्यक्रमाचे अद्यक्ष डॉ देवदत्त चाफेकर यांनी नाशिकमध्ये कोणत्या विषयांना संशोधनासाठी वाव आहे याची माहिती दिली. आई.ए.पी.इ.एन इंडिया असोसिएशनच्या नाशिक शाखेचा पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष डॉ सुजित चंद्रात्रे, सेक्रेटरी क्षितीजा गायकवाड, उपाध्यक्ष पिया हळदणकर, खजिनदार एकता किंगर, सदस्य रिश्ती मेहता, हर्षदा काकडे, विशाखा गोरे, सियाम शेख, पूजा देवरे, अनुजा जोशी, प्रियांका कोरी, या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाले. त्यांचा डॉ. देवदत्त चाफेकर आणि डॉ.शिवशंकर तिमानपती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी कोर 11 लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक प्रशांत देशपांडे यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ आहारतज्ञ पूजा शिरभाते व केतकी पुजारे यांनी केले. यावेळी नाशिक शहरातील आहारतज्ज्ञ उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!