गेल्या वर्षी च्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढला!

 नाशिक (प्रतिनिधी): मागील वर्षी दहा हजार मुलांमागे ८८७ पर्यंत खाली घसरलेला मुलींचा जन्मदर वाढू लागला असून, चालू वर्षातील जानेवारी महिन्यात मुलींचा जन्मदर ९६३, तर फेब्रुवारीत ९५४ इतका झाला आहे. यामुळे एक आशादायक चित्र निर्माण झाले आहे. गर्भलिंगनिदान कायद्यासंदर्भातील विविध उपाययोजना केल्या जात असल्याने मुलींच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.
शहरातील महात्मानगरसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत असलेल्या एका रुग्णालयात अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा प्रकार सप्टेंबर २०२४ मध्ये उघडकीस आला होता. एका माता मृत्यूच्या चौकशीदरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्भपाताच्या औषधांचा साठा आढळून आला होता. यामुळे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी स्त्री भ्रूणहत्या होत असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. नेमके याच काळात गेल्या वर्षभरात शहरातील मुलींचा जन्मदर घटला होता. गर्भलिंग निदान चाचणी करणे हा गुन्हा असून, सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीची मोहीम मनपा वैद्यकीय विभागाने हाती घेतली होती. मात्र त्यानंतरही चोरी छुप्या पध्दतीने गर्भलिंग निदान होत असल्याचे मुलींच्या घटलेल्या जन्मदराच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. दरम्यान, सोनोग्राफी सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्यास कारवाईचा इशारा वैद्यकीय विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!