नाशिक (प्रतिनिधी): यंदाची १४ वी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाथर्डी गावात दि.२२ व २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ४ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष सुदाम डेमसे, कार्यक्रमाध्यक्ष सोमनाथ बोराडे आहेत. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे तसेच विजय करंजकर, अजय बोरस्ते, गोरखनाथ बलकवडे, प्रा. रवींद्र मोरे, उत्तम दळवी, मधुकर वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी(दि. २३) सायंकाळी ७ वाजता मुलींच्या कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून, तो गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांच्या हस्ते पार पडेल.
Related Posts
घामाच्या थेंबांतून घडलेले स्वप्न साकारणारा पैलवान किशोर पवार; शरद फडोळ
भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या पैलवान किशोर पवारचा केला नाशिकच्या नगरसेवकाने गुणगैरव! नाशिक (प्रतिनिधी): कठोर परिश्रम, अपार जिद्द आणि अखंड शिस्त…
नाशिक ग्रामीण पोलिस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३८० जागांसाठी तब्बल ९६ हजार अर्ज
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला शनिवार (दि. २०) पासून प्रत्यक्ष मैदानी चाचण्यांद्वारे सुरुवात…
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा बुधवारी स्वच्छता दिवसाने समारोप!
नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा बुधवारी (दि.२) स्वच्छता दिवसाने…
