पैठणे क्लासेसचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात!

वणी (प्रतिनिधी): गणित हे सर्व शास्त्राचे शास्त्र असून त्यात पारांगत होण्यासाठी व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी अबॅकस उपयुक्त असल्याचे प्रतिपादन वणीचे उपसरपंच विलास कड यांनी पैठणे क्लासेस आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात प्रसंगी केले.

वणी येथील संताजी मंगल कार्यालय येथे नुकताच पैठणे क्लासेस आयोजित विभागीय स्तरावरील अभ्यास स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ पार पडला पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी चे उपसरपंच विलास कड होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना कड म्हणाले की, गणित हे सर्व शास्त्राचे शास्त्र असून त्यात पारांगत होण्यासाठी व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी अबॅकस उपयुक्त आहे. तसेच शालेय अभ्यासक्रम व खेळासोबत विद्यार्थ्यांमध्ये इतर कौशल्यांंची रुजवात करुन त्यांचे अष्टपैलु व्यक्तीमत्व घडवण्यासाठी पालकांनी सजग रहावे असे प्रतिपादन अंतरराष्ट्रीय खेळाडु मंगला बागुल यांनी केले. तसेच सपोनि गायत्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात हुशार बनवण्याबरोबरच सामाजिक दृष्ट्या संवेदनशील व जागृत बनवणे हे देखील पालकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. यास्पर्धेत नाशिक येथिल पैठणे क्लासेस चा ऋत्विक साळुंके हा विद्यार्थी चँम्पियन ऑफ दि चँम्पियन या पुरस्काराचा मानकरी ठरला. यावेळी व्यासपीठावर गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब गायकवाड, धोंडीराम पवार, पद्माकर पैठणे आदी उपस्थित होतेे. दरम्यान पालकांतुन नौशाद पिंजारी, संजय खेमानी, कौशल्या पवार आदींंनी आपले मनोगत व्यक्त केले.


सदर स्पर्धा परिक्षा दि. १८ ऑक्टो. ते २४ ऑक्टो. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. क्लासचे ८४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ४१ विद्यार्थी विविध पातळीवर यशस्वी ठरले तर पुनम शर्मा यांना उत्कृष्ट ट्रेनिंग सेंटर या सन्मानाने गौरविण्यात आले. यात चँम्पियन ऑफ दि चँम्पियन चा पुरस्कारसाठी ऋत्विक सुनिल साळुंके नाशिक या विद्यार्थ्याने बाजी मारली. याने. 8 मि. 52 सेकंदात १०० पैकी १०० उदा. सोडवीत प्रथम क्रमांक मिळवित सायकल हे पारितोषिक मिळविले. त्यानंतर कु. किर्तीराज मच्छिंद्र दसनुर रा. वणी व नमिता विकी चोरडिया रा. निफाड या विद्यार्थ्यांनी 9 मि. 52 सेकंदात १०० पेकी १०० असे समान गुण मिळवित स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक स्मार्ट लॉच मिळविले व कु. आर्या संदिप पवार हिने पैकीचा पैकी गुण मिळवित तिसरा क्रमांक पटकावत स्केटींग मिळवले.

यासोबतच अद्वय पानगव्हाणे, सानवी उगले, प्रणाली गायकवाड, साई वाडेकर, लियाना शर्मा, आनंदी शिंदे, पुर्वा जैन, अनुज शार्दुल, पलाक्षी व्यवहारे, संकेत गावित यांंनी चँम्पियन ची ट्रॉफी चे विजेते ठरले तर विनर या दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस रुद्राक्षी शर्मा, गीतीशा मनचंदा, स्वरा रोशन पवार, स्वरा ज्ञानेश्वर पवार, हर्ष चोरडिया, आरव कोरडे, इशिका सानप, अनन्या वाडेकर, राजविर सानेर, कार्तिक भिलोरे, शौर्य पाटील, रुपल महाले, साहिल इंगळे, अर्सलानखान पठाण या विद्यार्थ्यांनी मिळवले. तसेचअद्विक पानगव्हाणे, अरहान पिंजारी, जान्हवी वाटाणे, स्वराज सुर्यवंशी, धुर्व खेमाणी, वेद पवार स्वरुप बोरस्ते, कृतीका वाडेकर, आर्या शेलार, पर्व रुनवाल, स्वरा शेलार, हितेश गावित, आरोही शार्दुल आदी विद्यार्थ्यांनी रनर अप चे बक्षिस मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांना संचालक नामदेव पैठणे, सहसंचालिका स्मिता पैठणे, मार्गदर्शक, सुष्मा रुनवाल – निफाड, पुनम शर्मा – नाशिक, नाझिया शेख – दिंडोरी, दिप्ती शर्मा – खेतिया आदींचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेद्र पैठणे यांना केले तर आभार प्रदर्शन संचालिका स्मिता पैठणे यांनी केले. उपस्थित पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त करीत क्लासेस व्यवस्थापनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन दिले. यावेळी विद्यार्थ्यांसह मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!