5 सप्टेंबरपर्यंत पाऊस कुठे बरसणार तर कुठे गरजणार!

नाशिक (प्रतिनिधी): मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. 1 सप्टेंबरला राज्यातील मराठवाडा विभागात एवढा मुसळधार पाऊस झाला आहे की, अनेक नद्यांना पूरदेखील आला आहे. दरम्यान, 5 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहणार आह जसे “कभी खुशी, कभी गम” त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेत घराच्या बाहेर पडावे.

तसेच राज्यातील यवतमाळ, नांदेड, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, पंढरपूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, नगर, संभाजी नगर, सोलापूर, नाशिक, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव या 13-14 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. एवढेच नाही तर नाशिक व आजूबाजूच्या भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होईल. नाशिक आणि नगरमध्ये या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार असून या भागातील अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. याशिवाय मांजरा आणि दुधना नदीसारख्या मराठवाडातील अनेक प्रमुख नद्यांना पूर येऊ शकतो. एवढेच नाही तर लवकरच जायकवाडी धरण फुल भरेल.  हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी देखील अंदाज व्यक्तकरत सर्वांना अवाहन केले आहे.

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!