कुस्ती स्पर्धेत मुकणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

  • प्रतीक्षा राव व तनुजा शिंदे यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ब्रॉंज मॅडलला गवसणी
  • चैताली वेल्हाळ, वसुंधरा मुकणे यांची विभागस्तरापर्यंत व पल्लवी राव हिची जिल्हास्तरापर्यंत मजल

प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): मुकणे येथील प्रतीक्षा हरी राव व तनुजा पुंजा शिंदे या दोनही शालेय विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत मजल मारत तनुजा हिने ब्राँज मॅडल पटकावत यश संपादित केले आहे. तर चैताली खंडू वेल्हाळ, वसुंधरा पिंटू मुकणे यांची जिल्हास्तरापर्यंत तर पल्लवी नवनाथ राव हिची तालुकास्तरापर्यंत निवड झाली आहे.

सद्यस्थितीत सर्वत्रच क्षेत्रात महिलांची आघाडी असतांना ग्रामीण भाग मात्र अद्यापही यापासून दुरच दिसत असला तरी मुकणे गावच्या प्रतीक्षा, तनुजा, चैताली, वसुंधरा व पल्लवी या पाचही मुली मात्र याला अपवाद ठरल्या असुन त्यांनी कुस्ती स्पर्धेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरापर्यंत यश संपादन केल्याने केवळ त्यांच्या कुटुंबियांचेच नव्हे तर संपुर्ण मुकणे गावचे नाव ऊज्वल झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील असतांना व कुठल्याही क्लासेसविना केवळ गावातील संरक्षण खात्यात कार्यरत असणारे फौजी नामदेव राव क्रीडा प्रेमी युवक मिनींनाथ गुळवे, समाधान बोराडे आदी युवकांच्या मार्गदर्शनाने शेतातील मातीत सराव करून कुस्ती स्पर्धेत शालेय स्तरावरून जिल्हा, विभागस्तरीय व आता थेट राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये विजेते होऊन ब्राँज मॅडलला गवसणी घातली आहे त्यांच्या या यशामध्ये त्यांचा सराव करुन घेणारे मुकणे येथील छत्रपती शिवाजी महाराज आखाड्याचे फौजी नामदेव राव, मिनींनाथ गुळवे व समाधान बोराडे यांचा महत्वाचा वाटा आहे.

मुकणे : येथे कुस्तीपट्टू मुलींच्या सत्काराप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी (छाया : प्रभाकर आवारी)

ग्रामीण भागातील असतांनाही व अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शालेय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन करीत थेट राज्य पातळीपर्यंत जाणाऱ्या व ब्राँज मॅडल पटकवणाऱ्या मुकणे येथील या पहिल्याच स्पर्धक मुली असुन गावचे नाव राज्यस्तरापर्यंत नेत ब्राँज मॅडलला गवसणी घालत मुकणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असुन त्यांच्या या यशाबद्दल मुकणे गावकऱ्यांसह तालुकाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामपंचायततर्फे कुस्तीपट्टू मुलींचा सत्कार

दरम्यान मुकणे ग्रामपंचायतच्यावतीने सर्व यशस्वी कुस्ती पट्टू मुलींचा व त्यांचे क्रीडा शिक्षक डी.आर.तेलोरे, उमेश महाजन, समाधान बोराडे, मिनींनाथ गुळवे, खंडू वेल्हाळ आदींचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोटी बाजार समिती संचालक गणपत पाटील राव होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव, माजी सभापती कचरु पाटील शिंदे, चेअरमन जगन पाटील राव, सरपंच हिरामण राव, चंद्रभान बोराडे, बाळासाहेब आमले, बाळासाहेब धांडे, गोरख गतीर, मुख्याध्यापक बाबासाहेब थोरात, रामभाऊ राव, विष्णु वेल्हाळ, मनोहर आवारी, गणेश राव, निवृत्ती आवारी, सूर्यभान बोराडे, नरहरी आवारी, गोकुळ राव, हरिश्चंद्र राव, गजिराम राव, प्रकाश गुळवे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शालेय मुलींना क्रीडा क्षेत्रात योग्य दिशा मिळण्याच्या हेतुने प्रयत्न होणे आवश्यक असून त्यासाठी मुकणे येथील येथील नामदेव राव (फौजी) मिनींनाथ गुळवे व मी स्वतः त्यांच्या सरावासाठी प्रयत्नशील आहोत. कुस्ती स्पर्धेतील या पाचही मुलींना योग्य दिशा मिळाल्यास त्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड होऊ शकते.
– समाधान बोराडे
छत्रपती शिवाजी महाराज आखाडा, मुकणे

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!