सलग तिस-या वर्षी पुरस्कार : हैदराबादला १९ ऑक्टाेबरला वितरण
जगदिश वाघ,
नाशिक : तृणधान्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रशासनाच्या आयसीएआर-आयआयएमआर (इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मिलेट रिसर्च) तर्फे दरवर्षी देण्यात येणार ‘पोषक अनाज अवॉर्ड’ सलग तिसर्या वर्षी नाशिकची प्रसिद्ध ‘सोनपरी’ भगरला जाहीर झाला आहे. यंदा ‘इअर टू इअर ग्रोथ’ या गटात पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी (दि.१९) हैदराबाद येथे वितरण होणार आहे.
जागतिक पातळीवरून तृणधान्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मोहीम राबविली जाते आहे. २०२३ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीरही करण्यात आले होते. या धर्तीवर केंद्रशासनाच्या कृषी विभागातर्फे आयसीएआर-आयआयएमआरच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून तृणधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रचार-प्रसार केला जातो आहे. त्यासाठी देशभरातील तृणधान्य उद्योजकांना सन्मानित केले जाते. यंदाचा सोहळा हैदराबाद येथे होत असून, यातील इअर टू इअर ग्रोथ (तृणधान्याच्या माध्यमातून आर्थिक विकास) या गटामध्ये ‘पोषक अनाज अवॉर्ड’ नाशिकच्या यश फुडस्च्या ‘सोनपरी’ भगरला पुरस्कार जाहीर झाला आहे. या कंपनीचे उद्योजक महेंद्र छोरिया हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. दरम्यान, सोनपरी भगरला यंदा तिसर्या पोषक अनाज अवॉर्ड प्राप्त होतो आहे. २०२१ मध्ये ‘सोनपरी’च्या उत्पादनात नाविण्यता आणल्याबद्दल तर, २०२२ मध्ये तृणधान्याच्या प्रचार-प्रसारामध्ये बहुमोल योगदानाबद्दल सोनपरी भगरला पोषक अनाज अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे.
इअर टू इअर ग्रोथचे वैशिष्टये
महेंद्र छोरिया यांनी २००१ मध्ये यश फुडस् ही भगर उत्पादन करणारी कंपनी सुरू केली. त्यावेळी या कंपनीची ५८ लाखांची वार्षिक उलाढाल आणि २० हजारांचा नफा होता. २०२३ मध्ये एका कंपनीच्या चार कंपन्या आणि ४३ कोटींची वार्षिक उलाढाल व तृणधान्याचा प्रचार-प्रसार करताना त यातून आर्थिक विकासही साधता येत असल्याने सदरील पुरस्कार सोनपरी भगरला जाहीर करण्यात आला आहे.‘सोनपरी’ भगरमुळे नाशिकचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. केंद्र शासनाने तिसर्यांदा पुरस्कार मिळतो आहे. त्याचा आनंद आहेच.
-महेंद्र छोरिया, यश फुडस् प्रा. लि., नाशिक