नाशिक : 33/11केव्ही पाथर्डी उपकेंद्र येथे अत्यंत तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामाकरीता खालील दिलेल्या भागात व वेळेत विद्युत पुरवठा बंद राहील दिलेल्या वेळेपुर्वी काम पुर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल अथवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब होऊ शकतो याची कृपया वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी.
बंद राहणारा भाग:
चेतनानगर, वासननगर, नयनतारा, राजीवनगर, राणेनगर, किशोरनगर, पांडवनगरी, समर्थ नगर, शिव कॉलनी, सराफनगर, इंदिरानगर, पार्कसाईड, मेट्रोझोन, आव्हाड मळा, नागरे नगर, सोनवणे मळा, ज्ञानेश्वर नगर, श्रध्दा विहार, श्रध्दा गार्डन, सदिच्छा नगर, सिमेन्स कॉलनी.
