सातपूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी पार्टीच्या माजी नगरसेविका योगीता आहेर व भाऊ व मुलांस गाडी काढण्याच्या वादातून मारहाण करण्याचा प्रकार बुधवार (दि 27)घडला आहे. या प्रचारांनी योगिता आहेर यांनी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. योगिता आहेर या मुलगा व भावा बरोबर राहते घर काळे नगर येथून कामानिमित्त बाहेर जात होते. गाडी घराबाहेर काढत असताना त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या अन्या मुलाने वाद घालत, योगिता आहेर यांच्यासह मुलास व भावाला शिवागिळ करत मारहाण केली. यावेळी मुलाने फोन करून आपल्या सात आठ मित्रांना बोलवून घराव दगड फेक करत भावाचा मोबाईल चोरून नेला. मारहाण करणारे संतकबीर नगर परिसरात असून त्या बाबतीत आहेर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केल्या असून एक संशयित ताब्यात घेतले आहे.तपास पोलीस निरीक्षक राजू पठाण करत आहे.
Related Posts
नवरात्रोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज!
नाशिक (प्रतिनिधी): अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणा-या नवरात्रोत्सवासाठी कुंभनगरी सज्ज झाली असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरात नवरात्रोत्सवाचा फिवर…
नाशकात वेगवेगळ्या भागात पकडलेले लाखो रूपये नक्की कोणाचे?
नाशिक (प्रतिनिधी): निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडले लाखो रुपये. नक्की हे पैसे आले कसे व कोणाचा हा प्रश्न तर…
चार लाखांच्या अमली पदार्थाची विक्री करणारे दोन सराईत अटक
नाशिक (प्रतिनिधी): सिडको भागात मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणा-या दोघा सराईतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत ७१.५ ग्रॅम…
