भावपूर्ण श्रद्धांजली: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

नाशिक (प्रतिनिधी): ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी टाटा यांचे दूरदृष्टी असलेली व्यक्ती असे वर्णन केले आणि शोक व्यक्त करताना त्यांना एक विलक्षण माणूस म्हटले. रतन टाटा यांना 2008 मध्ये देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार – पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.

सोमवारी त्यांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांनी स्वत: आयसीयूमध्ये दाखल केल्याचा दावा नाकारला. मात्र, बुधवारी त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे पथक सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते, पण सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. रतन टाटा त्यांच्या साधेपणा साध्या स्वभावासाठी प्रसिद्ध होते. उदारीकरणाच्या कालखंडानंतर टाटा समूह आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे. टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!