नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र हास्ययोग संघ नाशिक यांच्या अंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त डिजीपी 2 येथे एकदिवसीय गरबा व दिंडियावर कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त लाफ्टर स्टार हास्य योग क्लब मधील महिलांनी या गरबा दांडिया कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र हास्ययोग संघाचे अध्यक्ष सुनील कोटगी सर यांचे मार्गदर्शन तर प्रदीप हिरे, लक्ष्मीकांत विसावे, प्रकाश विसावे यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा परीक्षक म्हणून वैभवी कोटगी यांनी काम बघितले.
85 वर्षांच्या आजींनीही धरला नवरात्राच्या दिंडियावर ठेका!
दरम्यान स्पर्धा सुरू असताना येथील देवी मंदिराच्या समोर राहत असलेल्या चारुलता कोठावदे यांच्या सासुबाई वय (वर्ष 85) या वृद्ध महिलेने गरबा दांडिया कसे खेळतात ते बघण्याची व खेळण्याची इच्छा दर्शवली सर्व स्पर्धकांना गरबा व दांडिया खेळण्यासाठी सांगितले. दरम्यान स्पर्धा कार्यक्रम संपलेला होता. मात्र वृद्ध महिलेची इच्छा पुर्ण करण्यासाठी सर्व उपस्थित महिलांनी त्या वृध्द आजींच्या घरातील कंपाउंड मध्ये दांडिया खेळत आजींना त्या आनंदी क्षणाचे साक्षीदार केले. यावेळी आजीपण सामील होत खुर्चीवर बसून त्या दांडिया खेळत होत्या.
तसेच लाफ्टर स्टार हास्ययोग संघाच्या अध्यक्ष शितल शिंदे व उपाध्यक्ष पुजा लहामगे, विजया हिरे यांनी आठ दिवस सलग परिश्रम घेऊन आपल्या क्लब मधल्या महिलांना गरबा दांडिया शिकवले आणि लाफ्टर स्टार हास्य क्लबच्या महिलांची मेहनत यामुळे दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी झालेल्या गरबा दांडिया कॉम्पिटिशन ही खूप उत्साहात पार पडली. दरम्यान कॉम्पिटिशन मध्ये पहिला क्रमांक पुजा गोरे, दुसरा क्रमांक विजया हिरे, तिसरा क्रमांक सुनीता नवले या तिघींनी उत्कृष्ट दांडिया स्पर्धक म्हणून बक्षीस घेतले. लाफ्टर स्टार हास्ययोग क्लब यांच्या तर्फे महाराष्ट्र हास्य योग संघ यांचे आभार मानत क्लब मधल्या अशा काही महिला आहे होत्या की ज्यांनी पहिल्यांदा गरबा दांडिया खेळत आनंद लुटला. लाफ्टर स्टार कमिटी मेंबर्स खजिनदार निशिगंधा सानप, सविता जाधव, नीता नेरकर, शुभांगी सरनाईक आणि सर्व क्लब सभासद यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सर्वांकडून महाराष्ट्र हास्य योगासंग यांच्याकडून आभार मानले गेले.