विकास शेंडगे,
घोटी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र मध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवत आहे सर्वसामान्य माणसाला या योजनेचा लाभ होत आहे. शासनाच्या विविध योजनांपासून महिलांना अनेक मोठे फायदे झाले आहेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या प्रभावी योजना राबविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले असून अनेक योजना राबवणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी व्यक्त केले. इगतपुरी तालुक्यातील पाच गटामध्ये गटामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी कावनई, अहुरली, नांदूर वैद्य, पाडळी, काळुस्ते या ठिकाणी शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे होते. त्यांच्या माध्यमातून ही शिबिर आयोजित करण्यात आली होती बँकेच्या आधार कार्ड संबंधित असलेल्या अडचणी बाबत विशेष करून चर्चा झाली तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कुठले गृह उद्योग करता येईल याबाबत देखील सांगण्यात आले दरम्यान शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले असे यावेळी तालुकाप्रमुख देविदास जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी तालुकाप्रमुख देवीदास जाधव, कुंडलिक जमदाडे, दत्ता गुंजाळ, खडू धान्डे, ज्ञानेश्वर जमदाडे, महिला जिल्हा प्रमुख पूजाताई धुमाळ, जिल्हा युवती सदस्य शितल भदाने, राखीताई जाधव, जयराम गव्हाणे, निशाताई गायकर,तालुका संघटक महिला आघाडी पुनम जाथव, गटपमुख महिला आघाडी शिरसाटे, सुनंदाताई खातळे आदी उपस्थित होते.
