सिडको विभागात भाजपचे वर्चस्व; शिवसेना शिंदे गटाने ठरवले नवे समीकरण

नाशिक: महापालिका निवडणुकीत सिडको विभागातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. सहा प्रभागांमध्ये झालेल्या लढतीत भाजपने १० जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने ९ जागा जिंकल्या आणि ठाकरे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत सिडको विभागावर शिवसेनेचे वर्चस्व होते, मात्र फुटीनंतर अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आणि नवीन राजकीय समीकरण तयार झाले.

प्रभाग २५, २६, २८ – भाजप व शिंदे गट यांचा संघर्ष:

  • प्रभाग २५: भाजपचे सुधाकर बडगुजर यांनी १९,८३४ मते मिळवून अ‍ॅड. अतुल सानप यांचा दारुण पराभव केला. महिला गटात साधना मटाले यांनी १४,१३३ मते मिळवून शोभना शिंदे यांना मागे टाकले. शिवसेना शिंदे गटाच्या कविता नाईक यांनी सर्वसाधारण जागेत १५,३३० मते मिळवून विजय मिळवला.

  • प्रभाग २६: निवृत्ती इंगोले, हर्षदा गायकर, नयना जाधव आणि भागवत आरोटे या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. निवृत्ती इंगोले यांनी माकपचे तानाजी जायभावे यांना पराभूत केले, हर्षदा गायकर यांनी भाजपाच्या मोहिनी पवार यांचा सात हजार मतांनी पराभव केला. नयना जाधव यांनी अपक्ष उमेदवार अलका अहिरे यांचा पराभव केला आणि भागवत आरोटे यांनी सचिन भोर यांचा पराभव केला.

  • प्रभाग २८: भाजप आणि शिंदे गटाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. भाजपच्या प्रतिभा पवार व शरद फडोळ, तर शिंदे गटाचे दीपक दातीर आणि सुवर्णा मटाले यांनी आपली गडपेठ राखली.

प्रभाग २७, २९, ३१ – नवख्या चेहऱ्यांचा उदय :

  • प्रभाग २७: नव्या चेहऱ्यांनी माजी नगरसेवकांना पराभूत केले. शिवसेना शिंदे गटाचे नितीन दातीर यांनी भाजपचे रामदास दातीर यांचा पराभव केला. भाजपच्या प्रियांका दोंदे यांनी आशा खरात यांना मागे टाकले. शिंदे गटाच्या किरण गामणे यांनी माजी नगरसेविका कावेरी घुगे यांचा पराभव केला. रास्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाचे किरण राजवाडे यांनी भाजपच्या ज्योती कवर यांना हरवले.

  • प्रभाग २९: तीन भाजप व एक अपक्ष विजयी ठरले. भूषण राणे यांनी ठाकरे गटाचे देवा वाघमारे व शिवसेनेचे जितेंद्र जाधव यांचा पराभव केला. भाजपच्या छाया देवांग यांनी ठाकरे गटाच्या मोनिका वराडे व शिवसेनेच्या सुमन सोनवणे यांना मागे टाकले. योगिता हिरे यांनी शिवसेनेच्या श्रद्धा पाटील यांना हरवले. अपक्ष मुकेश शहाणे यांनी दीपक बडगुजर यांचा पराभव केला.

  • प्रभाग ३१: भाजप व ठाकरे गटाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. भाजपचे भगवान दोंदे यांनी ठाकरे गटाचे संदीप दोंदे यांना पराभूत केले. माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांना ठाकरे गटाच्या माधुरी डेमसे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. ठाकरे गटाच्या वैशाली गवळी यांनी भाजपच्या डॉ. पुष्पा पाटील व शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता जाधव यांचा पराभव केला.

सिडको विभागातील या निवडणुकीत स्पष्ट झाले की, भाजप ने आपले पारंपरिक वर्चस्व राखले आणि स्थानिक स्तरावर नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली. शिवसेना शिंदे गट ने फुटलेल्या विरोधकांचा फायदा घेतले, मात्र संपूर्ण प्रभागावर प्रभुत्व टिकवण्यात अडचणी आल्या. ठाकरे गट चे यश मर्यादित राहिले, स्थानिक नेतृत्व आणि उमेदवारांच्या निवडीत फेरबदल आवश्यक आहे. या निवडणुकीत सिडको विभागात राजकीय समीकरण बदलले आहे, नव्या चेहऱ्यांचा उदय, फुटलेल्या विरोधकांचा फायदा आणि भाजपच्या आक्रमक धोरणामुळे भविष्यातील महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत या विभागात महत्त्वाची भूमिका बजावली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!