घोटी (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटी येथील सरकारी रुग्णालयात रुग्णांसाठी फळ वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. राजकीय कार्यक्रमांना सामाजिक जाणिवेची जोड देत “सेवा हीच खरी शिवसेना” या भूमिकेतून हा उपक्रम पार पाडण्यात आला. सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आजारपणाच्या काळात रुग्णांना आधार व दिलासा मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फळ वाटपामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
या कार्यक्रमास शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संपत काळे, उपजिल्हाप्रमुख रघुनाथजी तोकडे, त्र्यंबक–इगतपुरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय गुंजाळ, घोटी शहरप्रमुख तानाजी रुमणे, उपशहरप्रमुख राजेंद्र भोर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सामाजिक, आरोग्य व जनहिताच्या कार्याचा गौरव केला. “डॉ. श्रीकांत शिंदे हे केवळ लोकप्रतिनिधी नसून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी संवेदनशीलपणे काम करणारे नेतृत्व आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाने समाजातील गरजू घटकांप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
