कुणीही नायलॉन मांजा पतंग उडवत असेल बिल्डिंग चे नाव, लोकेशन, परिसराचा पत्ता किंवा संबंधीत व्यक्तिचे फ़ोटो तात्काळ 9923323311 या नंबर वर व्हाट्सएप तक्रार नोंदवा.तसेच मांजामुळ एखादा जखमी पक्षी आढळुन आल्यास शेवट नमुद यादीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक कर आज संक्रांतीच्या सण हा सर्वांना आनंदी व सुखमय होओ अशी इच्छा व्यक्त सर्वांनाच असते. सायंकाळी ‘तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला’ बोलत हा सण आपण तिळाचे लाडु एकमेकांस भरवत आनंद व्यक्त करतो. मात्र काही पतंग प्रेमी हे नायलॉन मांजा जो हाताने ही तुटू शकत नाही असा दोरा खरेदी वा विक्री करत पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. आणि हाच नायलॉन मांजा रस्त्यावर मार्गक्रमण करत असलेल्या वाहनचालकांच्या जिवावर बेततो तेंव्हा त्या कुटूंबात गोड बोलण्याऐवजी त्यांचा गोडवाच हेराऊन घेतो. तसेच हवेत उंच भरारी घेणा-या पक्षांचा काळ होतो. यामुळे सर्वांना नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की कोणीही नायलॉन मांजा ने पतंग उडवत असेल तर पोलिसांत किंंवा 9923323311 या व्हाट्सअप वर तक्रार करा. त्या व्यक्तीचा फोटो व बिल्डिंग चा पत्ता/लोकेशन या वर शेअर करा. तुमची एक तक्रार कोणाचा जिव वाचवू शकतो. नाशिकचे पो.आयुक्त संदीप कर्णिक यांनी जागरुक नागरिकांना असे आवाहन केले आहे.
