अखेर सणाच्या दिवशीच नायलाॅन मांज्यामुळे दुचाकीचालकावर ‘संक्रांत’

पाथर्डी फाटा ते वडनेर रस्त्यावर मांज्याने घेतला युवकाचा बळी

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या २२ वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून गळा चिरल्याने त्याचा मृत्यू झालाची घटना संक्रातीच्या दिवशी दुपारी १२ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू धोत्रे (वय २२, चरणवाडी, देवळाली कॅम्प) हा युवक १२ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (जी. जे. १५ डी. एस.८३४१) या क्रमांकाच्या गाडीहून पाथर्डीगाव ते देवळाली कॅम्प या रस्त्याने जात असतांना पाथर्डी गावाच्या चौफुली ओलांडून जात असतांना पतंगाचा नायलाॅन मांजा त्याच्या गाळ्यात अडकल्याने गळा माेठ्या प्रमाणावर चिरला. यावेळी प्रचंड रक्तश्राव झाल्याचे बघून रिक्षाचालक श्याम दोंदे व नागरिकांनी त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. कर्तव्यवर असणारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पवन परदेशी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता त्यास वैद्यकीय उपचार कसा मिळेल याबाबईकडे लक्ष देत पुढील हालचालीना वेग दिला. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने, तसेच गळा खाेलवर चिरल्याने खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, सोनूला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!