नाशिक (प्रतिनिधी): चुंचाळे पंपिंग स्टेशन येथे जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने सातपूर व सिडको भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यानुसार, दि. १६ व १७ जानेवारीला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच १८ जानेवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ मधील चुंचाळे घरकुल योजना, सातपूर विभागातील दत्तनगर परिसर, मारूती संकुल परिसर, कारगील चौक, माऊली चौक, दातीर वस्ती, मुकेशभाई पटेल शाळा, आनंद वाटीका परिसर, तुळजा भवानी चौक, बुध्दविहार परिसराला पाणी पुरवठा होणार नसल्याचे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.
सिडकोतील पवननगर जलकुंभ येथे जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून, मंगळवारी (दि. २१) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दि. २२ जानेवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा आहे. त्यानुसार, प्रभाग क्रमांक २४ मधील उंटवाडी, जगतापनगर, तिडकेनगर, कालिका पार्क तर प्रभाग क्रमांक २५ मधील रायगड चौक, शनिचौक, पवननगर भाजी मार्केट, अक्षय चौक, उदय कॉलनी, श्रीरामनगर, सप्तश्रृंगी चौक, प्रभाग क्रमांक २७ मधील महाकाली चौक, राजरत्ननगर, दुर्गामाता मंदिर, राम मंदिर तसेच प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्क या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे मनपाने कळवले आहे.
