घोटीवाडी (ओमानंद नगर) येथे मारुती मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उत्साहपूर्ण प्रतिसाद

इगतपुरी (प्रतिनीधी): घोटीवाडी (ओमानंद नगर) येथे अत्यंत श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात मारुती मंदिराच्या नव्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. गावाच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या मारुती मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी इंजि. सचिन लंगडे  हे पार पाडणार आहेत.
भूमिपूजन कार्यक्रम वामन खोसकर, ज्ञानेश्वर लहाने, संदीप गुळवे, गोरख बोडके, तानाजी रुमणे, राजेंद्र भोर या मान्यवरांच्या हस्ते विधीवत पार पडला. यावेळी गावातील ज्येष्ठ ­- मान्यवरांनी देवस्थानाच्या विकासाबाबत समाधान व्यक्त केले.

ग्रामस्थांचा उत्साह लक्षणीय होता. गावकरी मंडळी मल्हारी दालभगत, सचिन भगत, समाधान आडोळे, मनोहर आडोळे, सुरेश आडोळे, पुंजाराम भोर, अजय गतीर, लखन भगत, मनोज आडोले, सूरज आडोले, समाधान आडोले, सचिन भगत आदींची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

मारुती मंदिराच्या बांधकामामुळे गावाच्या धार्मिक व सामाजिक केंद्रस्थानी भर पडेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी गावात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!