२० नोव्हेंबर रोजी नाशिक मध्य मतदारसंघात ३०३ मतदान केंद्रावर होणार मतदान!

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघात ३०३ मतदान केंद्रांवर दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात एकूण तीन लाख ४३ हजार ५७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्पित चौहान यांनी दिली आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख ७४ हजार ३४४ पुरुष मतदार, एक लाख ६९ हजार १७५ स्त्री मतदार आणि ५७ तृतीयपंथी असे एकूण तीन लाख ४३ हजार ५७६ मतदार आहेत. तसेच, सैनिक मतदार संख्या १०७ इतकी असून, यात १०१ पुरुष मतदार व सहा स्त्री मतदार आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर येथे होणार आहे. पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी व मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वीप कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली असून, त्यास प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजावून मतदान करावे, असे आवाहनही चौहान यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!