विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात केली आत्महत्या!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील गौळणे गावातील कुटुंबासोबत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये पुन्हा एक आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याने नाशकात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. अस्मिता संजय पाटील (18) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!