महाशिवरात्रीनिमित्त ‘हर हर महादेव…’, ‘बम बम भाले…’चा जयघोष; विविध कार्यक्रमांचे आयोजन!

नाशिक (प्रतिनिधी): शिवभक्तांसाठी महत्त्वाचा मानला गेलेला महाशिवरात्रीचा सण बुधवारी (दि. २६) भक्तिपूण वातावरणात साजरी होणार आहे. यानिमित्त शहरातील सर्व छोट्या-मोठ्या शिवमंदिरांना रंगरंगोटी करून त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी (दि. २५) शहरात सणाची तयारी पूर्ण झाली असून, मध्यरात्रीपासूनच ‘हर हर महादेव…’, ‘बम बम भाले…’चा जयघोष सुरू झाला होता. बुधवारी विविध ठिकाणांहून पालखी मिरवणुका निघणार आहेत. तसेच, महापूजा, अभिषेक, महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त पंचवटीतील रामकुंडात स्नानासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, तसेच मंदिरांमधील भाविकांच्या गर्दीने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील सोमेश्वर मंदिरात सकाळी ६ वाजता महापूजा व आरती होणार आहे. श्री काळाराम मंदिराकडे जाणा-या मार्गावर आद्य शंकराचार्य स्थापित श्री शृंगेरी शारदापीठाच्या मठामध्येही महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपवासाच्या अनुषंगाने रताळी, खजूर, साबुदाणे, शेंगदाणे, वेफर्स, फळे आदी पदार्थांची मागणी वाढली आहे. साबुदाणा ६० ते ६५, शेंगदाणे १३० व खजूर १५० रुपये किलोपासून पुढे आणि राजगिरा लाडू ३० रुपयांचे पाकिट या दराने विक्री होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!