त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या उपाध्यक्षपदी सुनील मोरे यांची निवड

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी): येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बहिरू मुळाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्येक्षमतेचा व प्रामाणिक प्रयत्नांचा विचार करत पक्षाच्या वतीने सुनील विठोबा मोरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी ना. अजित दादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष व खा. सुनिलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, तसेच आमदार हिरामण दादा खोसकर यांच्या विचारानुसार पुढील काळात पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्य करणार असून पक्षाच्या हितासाठी आपली उर्जा खर्च करत, तसेच पक्ष संघटना मजबुतीने उभी करतील अशी अपेक्षा व्यक्त करत अध्यक्ष मुळाणे यांनी व आ. हिरामण खोसकर यांनी व उपस्थित कार्यकर्त्यांनी मोरे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

उपाध्यक्ष या पदावर माझी नियुक्ती करण्यात आल्याने मला पुर्ण विश्वास आहे की, मी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे चागल्या पद्धतीने पालन करेल आणि माझा पक्षसंघटन व शेतक-यांच्या समस्या असो व विद्यार्थी, युवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहुन अध्यात्मिक व  सामाजिक कार्यामध्ये महत्वपुर्ण योगदान राहिल.

सुनील मोरे, उपाध्यक्ष, त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!