नॅब चे कार्य समाजाला आदर्श व प्रेरणा देणारे: कांतीलालजी चोपडा

अंध, दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नॅब प्रयत्नशील

  • इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या परिपूर्ती निमित्ताने समाजातील दानशूर मान्यवरांचा सत्कार
  • नॅब कडून अंध, वृद्धांसाठी लवकरच अद्यावत इमारतीचे लोकार्पण: ॲड. सुराणा

नाशिक (प्रतिनिधी): खरतर तर समाज्यामध्ये वृद्ध आश्रम बनत आहे ही बाब काही सकारात्मक नाही परंतु, आज समाज्यातील विविध स्तरांकडून वृद्धांची होणारी अवहेलना, त्यांच्या कडे होणारे दुर्लक्ष, त्यांच्या आरोग्याची, खाण्या – पिण्याची योग्य ती काळजी न घेणे, औषध उपचार वेळेत न मिळणे, याबाबत आताची पिठी ही काहीशी निष्काळजी होत चाललेली आहे. यामुळे वृद्धांचे हाल होत असून त्यांना दैनदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज होत चाललेली आहे अस म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही असे उदगार उद्योजक व समाजसेवक कांतीलालजी चोपडा यांनी केले आहे.

नॅब च्या वतीने तयार होत असलेल्या अंध व वृद्धाश्रम इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या परिपूर्ती निमित्ताने समाजातील दानशूर मान्यवर ज्यांनी या प्रकल्पासाठी विशेष सहकार्य व आर्थिक मदत केली आहे त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी अध्यक्षनीय भाषणात कांतीलालजी चोपडा हे बोलत होते. यापुढे त्यांनी सांगितले की, दृष्टिहीनांना निस्वार्थ मदत करण्यासाठी ही संस्था कायम विशेष प्रयत्न करत आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे वयाची ८२ वर्षी देखील तरुण व्यक्ती सारखे जोमाने काम करत आहे हि बाब समाजाला नक्कीच आदर्श व प्रेरणा देणारी आहे. त्यांनी आजवर केलेले कार्य हे खरोखर कौतुकास्पद व नेत्रदीपक आहे. नाशिक मध्ये अनेक मोठ व्यावसायिक, उद्योजक व दानशूर लोक आहेत त्यांनी नॅब च्या या प्रकल्पाची, कार्याची माहिती घेऊन शक्य तितकी आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अंध दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी नॅब च्या माध्यमातून आजवर विविध कार्यक्रम राबविलेले असून यासाठी लागणारी मोठी आर्थिक मदत ही समाज्यातील दानशूर लोकांच्या माध्यमातून पूर्ण होत असते. संस्थेला  शासनाचे कोणत्याही प्रकारे अनुदान किंवा आर्थिक मदत मिळत नाही. आपण सर्व या समाज्याचाच एक भाग आहोत आणि या समाज्यानेच आपल्याला भरभरून दिलेले असते मग आपणही त्यातील काही भाग हा समाज्याला परत केला पाहिजे. समाज कार्य घडवून आणणे हे कोणी एका व्यक्तीची जबाबदारी नाही त्यासाठी अनेक गोष्टीचा हातभार लागत असतो तेव्हाच ते कार्य पूर्णत्वास जाते. नॅब ने अंध, वृद्धांसाठी सर्व सोईयुक्त आश्रम करण्याचा पण हाती घेतला आहे यासाठी समाज्यातील दानशूर लोकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा ॲड विद्युल्लता तातेड यांनी केले आहे.

कार्यक्रमास यावेळी अतिथी म्हणून कांतीलालजी चोपडा, नंदकिशोरजी निराली, शोभाताई शहा, शशिकांतभाऊ सुरांणा, विशाल सेदाणी, ऍड सिंधुताई पगारे, हेमंत देशपांडे, विष्णुभाऊ ढगे, राजाभाऊ ढगे, संस्थेचे पदाधिकारी शितलभाऊ सुराणा, अनिल चव्हाण, संगीताबेन शाह, मंगलचंदजी साखला, आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए लोकेश पारख यांनी केले तर आभारप्रदर्शन अनिल चव्हाण यांनी केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड प्रकाशचंद्र सुराणा यांनी संस्थेच्या आजवरील प्रवासाची व कार्याची माहिती देताना सांगितले की अंध, दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे व त्यांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी सर्वोत्परी मदत करणे हेच ध्येय आहे. आजवर संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांचे नेत्र तपासणी व उपचार केले असून ५०० हून अधिक लोकांना अर्थ सहाय्य तर केलेच आहे त्याच बरोबर अनेकाना स्वतःचा व्यवसाय व नोकरी करिता मदत केली आहे. नियोजित अंध, दिव्यांग वृद्धाश्रमाच्या अद्यावत इमारतीचे काम नाशिक येथील बेळगाव ढगा याठिकाणी प्रगतीपथावर सुरू असून अतिशय प्रसन्न, निसर्गरम्य अशा वातावरणात अद्यावत इमारतीचे लवकरच लोकार्पण करण्याचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!