दसरा मेळाव्यासाठी इगतपुरीतून हजारोंच्या संख्येत शिंदेगट समर्थक शिवसैनिकांची उपस्थिती!

विकास शेंडगे,

घोटी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला इगतपूरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातुन हजारो शिवसैनिक रवाना झाल्याची माहिती माजी आमदार काशिनाथ मेंगाळ व तालुकाप्रमुख देवीदास जाधव यांनी दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर ठेवला आहे कळताच सर्व समर्थकांनी शिवाजी पार्कच्या तुलनेत आझाद मैदान दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे शिंदे गटाने ताकद लावली होती.

मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी नाशिक जिल्हयातुन शिंदे गट समर्थक लाखो शिवसैनिक या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याची तालुका प्रमुख देवीदास जाधव यावेळी म्हणाले. इगतपुरी तालुक्यातून शंभर छोट्या खाजगी गाड्या या गाडयांमधुन हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्याला गेले. याप्रसंगी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुका प्रमुख देवीदास जाधव, सदानंद नवले, संपर्क प्रमुख कुंडलीक जमदडे, खंडेराव धांडे, दत्तात्रय गुंजाळ, भगवान वाघचौरे, संदीप जाधव, विश्वास खातळे, भास्कर आहेर, बाळा गव्हाणे, संजय आरोटे यांच्यासह हजारो शिवसैनिक मुंबईला गेले होते.

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!